
पुणे, 19 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रात माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी करणे गरजेचे आहे.राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक, शिक्षक पदभरतीसाठी शासनामार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 या परीक्षेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते.ही परीक्षा याच वर्षात 27 मे ते 30 मे व 2 जून ते 5 जून या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीसाठी 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 9 हजार 101 उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्व-प्रमाणपत्र करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु