
लातूर, 19 डिसेंबर (हिं.स.)।
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत लातूर महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाच्या दोन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
नगरसेवक लातूर चे काजी अथरोद्दीन मुजोरोदिन काजी, मोसिन हकीम शेख यांनी आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मधे जाहीर प्रवेश केला.
या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे लातूर शहर जिल्हा अध्यक्ष मकरंद सावे , आण्णा बनसोडे ,शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील,विधार्थी प्रदेश मुख्य सरचिटणीस विशाल विहीरे यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis