
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)। शब्दप्रभु मासिक व जन कल्यान फाऊंडेशन अमरावती व आयोजन समीती चा वतीनें आयोजीत संत गाडगे बाबा यांच्या ६९व्या पुण्यतिथी निमित्य दिंनाक २० डिंसेबर २०२५ला भगवान् मुंगसाजी माऊली दरबार सभागृहात चैतन्य कालनी अमरावती येथे दुपारी ३ वाजता संत गाडगे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. आयोजन समीती अध्यक्ष दिपक गिरोळकर सचीव-गोपाल उताणे यांनी एका पत्रका व्दारे अखिल भारतीय गुरुदेव समीती सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांना संत गाडगे बाबा स्मुती राष्ट्रीय जीवन गौरव सेवा सन्मान पुरस्कार २०२५ जाहिर करण्यात आला आहे.
तर संत गाडगे बाबा स्मुती राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ करीता आकाशवाणीचे मुख्य निवेदक संजय ठाकरे साहेब, स्वयंसिध्द अभियान चे अध्यक्ष किरण पातुरकर, कैलाश छाया ट्रस्ट्रचे अध्यक्ष कैलाश गिरोळकर, नाट्यकर्मी सुशील दत्त बागडे, रोटरी चे अतुल कोल्हे, प्रा हरीदास खुळे सर, मिंलीद मानकर सचीव - भगवान् मुंगसाजी माऊली बहुउदेदशीय संस्था, पतंजलि चे अरंवीद परदेशी, धम्म प्रचार समीती सचीव गोपाल ईंगळे, सावली बँक चा सौ. वर्षाताई शिंगणे यांची निवड करण्यात आली आहे.
या सोहळ्याचा अध्यक्ष स्थानी अच्युत महाराज हार्ट हास्पिटल चे विश्वस्त संत सचीन देव महाराज कुपया शिष्य संत अच्युत महाराज, प्रमुख पाहुणे डॉ नितीन धांडे, अध्यक्ष विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती, संत डॉ संतोश देवजी महाराज, सुभाष पावडे अध्यक्ष श्री कुष्ण मंदिर देवस्थान माता खिड़की, माजी उपमहापौर चेतन पवार, रुपम सुर्यवंशी, अन्नपूर्णा रुपाली जीतेंद्र सगणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
आयोजन समीती अध्यक्ष दिपक गिरोळकर अध्यक्ष जन कल्यान फाऊंडेशन अमरावती, आयोजन समीती सचीव गोपाल उताणे संपादक शब्दप्रभु मासिक अमरावती, निंमत्रक मंजुषा उताणे, सयोंजीका योगीता बोंडे, वनीता गिरोळकर, आयोजन समीती सदस्य जुगल किशोर गट्टानी, लक्ष्मनराव ढवळे, दादा साहेब टोपले, गजानन सोनोने, अविनाश वाटाणे, डॉ गुणवत डहाणे, रंगरावजी कडु महाराज, भोलेश्वर मुदगल, अमोल चवणे, विलास साखरे, सवीता सायर, हर्षा सगणे, निकीता गांवडे, छायाताई गिरोळकर, रेखाताई गिरोळकर, रोषणी गिरोळकर, कविता चांदेकर, अंजली पडोळे, ज्योती देवताळे, श्रीमती गिता ठाकुर, कृष्णाई गिरोळकर व कोमल उताणे या आयोजन समितीच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याची विनंती केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी