
नंदुरबार,, 19 डिसेंबर (हिं.स.)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे शासकीय निवासी शाळेचे विशेष अधिकारी विवेक चव्हाण यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी 30 नाव्हेंबर असते तथापि, या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि शैक्षणिक सत्र उशिरा सुरू होणे, या बाबी विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही शासकीय निवासी शाळेचे विशेष अधिकारी श्री. चव्हाण यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर