उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचार रॅली सुरू
ठाणे, 19 डिसेंबर, (हिं.स.)। ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मुलाखतींचेच सत्र सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने कळव्यात प्रचार रॅलीदेखील सुरू केल्या आहेत. या रॅली
ठाणे


ठाणे, 19 डिसेंबर, (हिं.स.)। ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मुलाखतींचेच सत्र सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने कळव्यात प्रचार रॅलीदेखील सुरू केल्या आहेत. या रॅलीदरम्यान, उमेदवारी कोणालाही मिळो, पण गद्दारी गाडणारच, असा निर्धार इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला.

ठाणे महानगर पालिका निवडणुकीच्या आधीच प्रचारात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॠता आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये गुरूवारी राष्ट्रवादी (श.प) च्या वतीने रॅली काढून रणशिंग फुंकले.

गुरूवारी सकाळी कळव्यातील ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन रॅलीला सुरूवात करण्यात आली. तर, सायंकाळी विटावा येथे प्रचार रॅली काढण्यात आली. या पक्षाकडे चारशेपेक्षा अधिक इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. असे असताना सर्व इच्छुक उमेदवार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनीच, उमेदवारी कोणालाही मिळो; पण, जनतेच्या मतांवर विजयी होऊन जनतेशी गद्दारी करीत पक्षबदल करणाऱ्यांना पाडणारच, असा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande