रत्नागिरी : सागर महोत्सवाअंतर्गत जबाबदार पर्यटनावर पथनाट्ये
रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवानिमित्ताने सागर किनारी आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनावर आधारित पथनाट्य सादर होणार आहेत. रत्नागिरीतील सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण होणार असून त्याची सुर
रत्नागिरी : सागर महोत्सवाअंतर्गत जबाबदार पर्यटनावर पथनाट्ये


रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवानिमित्ताने सागर किनारी आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनावर आधारित पथनाट्य सादर होणार आहेत.

रत्नागिरीतील सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण होणार असून त्याची सुरुवात शनिवारी (दि. २० डिसेंबर ) रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे होणार आहे. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी पथनाट्य सादर करणार असून पर्यटन, पर्यावरणाची जाणीव जागृती या निमित्ताने हे पथनाट्य संदेश देणार आहे.

येत्या १५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे. सागरी जैवविविधता, खाडी, कांदळवन संवर्धनासाठी व्याख्याने, संशोधन, अभ्यास सहल, पथनाट्य माध्यमातून समुद्राबद्दल जनजागृती व सहभाग वाढविणे या हेतूने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. पथनाट्याच्या माध्यमातून मासेमारी, जबाबदार पर्यटन, सागरी जीव सुरक्षा या विषयाचे प्रबोधन व जाणीव जागृती करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande