नाशिक - जिल्हा पुन्हा गारठला; 7.4 अंश तापमानाची नोंद
नाशिक, 19 डिसेंबर, (हिं.स.)। नाशिक जिल्हा पुन्हा एकदा थंडीने गारठला आहे. नाशिकचे तापमान हे तीन दिवसांमध्ये तीन अंश डिग्री सेल्सिअसने खाली उतरलेले आहे. शुक्रवारी सकाळी किमान तापमान हे 7.4 अंश डिग्री सेल्सिअस नोंदविला गेला आहे तर सर्वात कमी तापमान हे
नाशिक - जिल्हा पुन्हा गारठला; 7.4 अंश तापमानाची नोंद


नाशिक, 19 डिसेंबर, (हिं.स.)। नाशिक जिल्हा पुन्हा एकदा थंडीने गारठला आहे. नाशिकचे तापमान हे तीन दिवसांमध्ये तीन अंश डिग्री सेल्सिअसने खाली उतरलेले आहे. शुक्रवारी सकाळी किमान तापमान हे 7.4 अंश डिग्री सेल्सिअस नोंदविला गेला आहे तर सर्वात कमी तापमान हे निफाड तालुक्याचे नोंदविण्यात आलेले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी जिल्ह्याच्या तापमानामध्ये घट होऊन नाशिक जिल्हा हा गारठलेला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक जिल्हा एकदा गारठला आहे मागील तीन दिवसांमध्ये जिल्ह्याचे तापमान तीन अंश डिग्री सेल्सिअसणे कमी झालेले आहे बुधवारी नाशिकचे तापमान 10.4 अंश होते तर गुरुवारी नाशिकचे तापमान 9.8 डिग्री सेल्सिअस आहे एका दिवसामध्ये म्हणजेच शुक्रवारी नाशिकचे तापमान हे दोन पॉईंट चार अंश डिग्री सेल्सिअसने कमी झालेले आहे शुक्रवारी नाशिकचे किमान तापमान हे 7.4 अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी तापमान हे निफाड तालुक्याचे नोंदविण्यात आली असून निफाड तालुक्याचे तापमान हे 5.4 अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. जिल्हा पुन्हा एकदा थंडीने गारठलेल्या नंतर परिणाम जिल्ह्यातील जनजीवना वरती देखील झालेले आहे. वाढत्या थंडीमुळे रब्बी पिकांना फायदा होण्याचा अंदाज कृषी तज्ञ व्यक्त करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande