
लातूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। उदगीर नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी शनिवारी काही ठिकाणी मतदान होणार असून रविवारी मतमोजणी होणार आहे प्रशासनाने या संपूर्ण मोहिमेची खबरदारी घेतली असून पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. शनिवारी काही प्रभागात मतदान होत असून प्रत्यक्ष मतमोजणी रविवारी होणार आहे या दृष्टीने प्रशासनाने सर्व ती तयारी केली आहे
उदगीर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी २ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी व १७प्रभागातील सदस्य पदासाठी मतदान झाले होते. या मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी २० टेबलवर ५ फेऱ्यात होणार आहे. व तसेच शहरातील प्रभाग ८ अ, प्रभाग १५ ब, १६ ब, या तीन प्रभातील ३ जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून या तीन प्रभागातील मतमोजणी १३ टेबलवर ६ व्या फेरीत होणार आहे.
उदगीर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीची फेरनिहाय्य मतमोजणी पुढील प्रमाणे. पहिल्या फेरीत १९ टेबलवर प्रभाग क्र.१ ते ४ प्रभागातील एकुण १९ मतदान केंद्रातील मतमोजणी होणार आहे.
तर दुसऱ्या फेरीत २० टेबलवर प्रभाग क्र.५ ते ८ प्रभागातील २० मतदान केंद्रातील मतमोजणी होणार आहे. व तसेच तिसऱ्या फेरीत १८ टेबलवर प्रभाग क्र.९ ते १२ प्रभागातील १८ मतदान केंद्रातील मतमोजणी होणार आहे. व चौथ्या फेरीत १७ टेबलवर प्रभाग क्र.१३ ते १६ प्रभागातील १७ मतदान केंद्रातील मतमोजणी होणार आहे. व तसेच पाचव्या फेरीत १७टेबलवर प्रभाग क्र.१७ ते २० प्रभागातील १७ मतदान केंद्रातील मतमोजणी होणार आहे. व तसेच २० डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रभाग ८ आ, १५ ब, आणि १६ ब, या तीन प्रभातील १३ मतदान केंद्रातील मतमोजणी हे सहाव्या फेरीत १३ टेबलवर होणार आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis