
लातूर, 19 डिसेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार धीरज देशमुख यांच्या बाभळगाव येथील शेतामध्ये पारंपरिक वेळ अमावस्येचा सण श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
शेतकरी संस्कृतीत विशेष महत्त्व असलेल्या या सणानिमित्त विधिवत पूजन करून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पिढ्यान्पिढ्या जपलेली ही परंपरा आजही कायम ठेवत, यावेळी सहकारी, मान्यवर व आप्तेष्टांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. परंपरा जपत एकत्र येण्याचा, आपुलकी वाढवण्याचा आणि सामाजिक सलोखा दृढ करण्याचा हा क्षण सर्वांसाठीच आनंददायी ठरला.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis