
पालघर, 19 डिसेंबर (हिं.स.)।
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी दरवर्षी प्रमाणे संसदेत सादर केला जाईल, तथापि स्वतंत्र रेल्वे बजेट सादर होत नसल्याने सामन्य रेल्वे प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सविस्तर अशी माहिती उपलब्ध होऊ शकत नाही.
विरार डहाणू चौपदरीकरण प्रकल्प २०१६ साली मंजूर झाल्यानंतर ह्या प्रकल्पाला येणारा खर्च ३५५८ कोटी रुपये दर्शवण्यात आला होता. त्यानंतर आज जवळजवळ ९ वर्ष पूर्ण झाली असून पाच वर्षांत पूर्ण होणारा प्रकल्प २०२७ ला पूर्ण होईल असे सांगण्यात येत असले तरी खरच हा प्रकल्प २०२७ ला पूर्ण होईल का असा प्रश्न प्रत्येक प्रवासी आवर्जून विचारत आहे. आज विरार डहाणू चौपदरीकरण प्रकल्पा व्यतिरिक्त ९ वर्षात कुठला इतर निधी मंजूर झाला होता का? आणि तो कुठल्या कामासाठी? ह्याचे विश्लेषण कधी उपलब्ध करण्यात आले नाही.यंदाचे बजेट हे २०२६-२७ चे असल्याने आणि हा प्रकल्प सुद्धा अंतिम वर्षात मार्गक्रमण करत असल्याने संपूर्ण निधी उपलब्ध केला जाईल का?
येत्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या बजेटच्या अनुशंगाने डहाणू विभागाला काय उपलब्ध होईल हे पाहता डहाणू रेल्वे विभागासाठी नवीन प्रकल्पाचा विचार करायचा झाल्यास कुठल्या प्रकल्पाला नव्याने निधी जाहीर होईल.
खालील दोन प्रकल्प सध्या प्रामुख्याने महत्त्वाचे वाटतात
१) विरार डहाणू चौपदरीकरण अंतर्गत प्रकल्प भाग -२ 🟣 वाणगाव येथील लोकलच्या देखभालीसाठी कारशेड बांधणे. 🟣 विरार डहाणू दरम्यान ८ नवीन स्थानके बांधणे. २) डहाणू-नाशिक रेल्वे मार्गासाठी अंदाजे येणार खर्च आणि मंजूर निधी. 🟣 डहाणू नाशिक सर्व्हेक्षण खर्चाचा निधी 🟣 डहाणू नाशिक रेल्वे मार्ग टाकण्यासाठी खर्चामधून मंजूर निधी. ३) प्रवाशांच्या इतर मागण्या. 🟣 ५९०२३/२४ वलसाड फास्ट पेंसजरला LHB डब्बे लावणे. 🟣डहाणू-भिवंडी-ठाणे मेमू सुरू करणे. 🟣१९४२५/२६ नंदुरबार पेंसजरला वैतरणा स्थानकात थांबा देणे. 🟣विरार-वलसाड मेमू गाड्या सुरू करणे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL