डोकं नसलेला राज्यातील निवडणूक आयोग; उत्तम जानकर यांची टीका
सोलापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। सध्या निवडणूक आयोग हा झुकांड्या खातोय, रात्रीचे दारू पितोय सकाळी एक वेगळा जीआर काढतोय, दोन दोन महिने निवडणुका थांबवणे व लांबणीवर टाकणे.पारदर्शकता नसणे. प्रचाराला एक दिवस वाढवून देतोय अशा पद्धतीने अक्कल आणि डोकं नसलेल्य
uttam  jankar


सोलापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। सध्या निवडणूक आयोग हा झुकांड्या खातोय, रात्रीचे दारू पितोय सकाळी एक वेगळा जीआर काढतोय, दोन दोन महिने निवडणुका थांबवणे व लांबणीवर टाकणे.पारदर्शकता नसणे. प्रचाराला एक दिवस वाढवून देतोय अशा पद्धतीने अक्कल आणि डोकं नसलेल्या निवडणूक आयोग असेल तर सरकारची क्षमता काय असेल अशा पद्धतीने खिल्ली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी उडवली.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने ते मंगळवेढा येथे आले होते. सभेच्या समाप्तीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना आ. जानकर म्हणाले की, सध्याच्या सरकारने सरकारी दहशतवाद निर्माण केल्यामुळे कुणाला लढू दिले जात नाही,कुणाला अर्ज भरून दिला जात नाही.जर भरला तर अर्जातील कागदपत्रे गायब केली जातात.साखर कारखाना व संस्थेच्यामागे ईडी,सी.बी.आय. चौकशीचा ससेमिरा लावून जेरबंद केले.त्यात जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या आमदारालाही जेरबंद केले.

माजी आमदारकी घालवण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे. जातीचा दाखला रद्द करतो,कोर्टात पीटीशन चालवतो.यासह अनेक माध्यमातून प्रयत्न चालवले जात आहे. पण माझा जन्म आमदारकीसाठी झाला नाही मी लढाऊ कार्यकर्ता आहे. सध्याच्या सरकारने सरकारी दहशतवाद निर्माण करत गावागावात गुंड निर्माण केले आहेत एखाद्या गावात नसेल तर शेजारच्या गावातून पुरवले जातात. आमच्याही तालुक्यात बाहेरून आणलाय. त्यासाठी आर्थिक रसद पुरवले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande