मंगळवेढा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण - तहसीलदार जाधव
सोलापूर, 19 डिसेंबर, (हिं.स.)। मंगळवेढा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकी साठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आज मतदान पथके त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना होतील अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. मतदान पथकांमध्ये राखीव सह एकूण 20
मंगळवेढा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण - तहसीलदार जाधव


सोलापूर, 19 डिसेंबर, (हिं.स.)। मंगळवेढा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकी साठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आज मतदान पथके त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना होतील अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

मतदान पथकांमध्ये राखीव सह एकूण 205 कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यात राखीव सह 41 केंद्राध्यक्ष असतील. झोनल अधिकारी राखीव सह 6 असून प्रत्येक केंद्रावर मदतीसाठी 8 मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवेढा नगर परिषद अंतर्गत एकूण 31 मतदान केंद्र असून सर्व केंद्राची तपासणी करण्यात आली आहे.

दिनांक 20 रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी 6.30 वाजता मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अभिरुप मतदान (मॉकपोल) घेतला जाणार असून त्यानंतर सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात केली जाईल. मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कुणालाही प्रचार करता येणार नाही तसेच कोणतेही प्रचार साहित्य घेऊन येता येणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande