बीड : खरडून वाहून गेलेल्या जमिनीच्या विकासासाठी अनेक ठिकाणी नाम फाऊंडेशन करणार मदत
बीड, 19 डिसेंबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंदफणा नदीला आलेल्या महापुरात गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे कुक्कडगाव ता. बीड येथिल कोल्हापूरी बंधारा क्षतिग्रस्त झाला होता. नाम फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंदफणा
सिंदफणा नदी पात्रातील क्षतिग्रस्त बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले


बीड, 19 डिसेंबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंदफणा नदीला आलेल्या महापुरात गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे कुक्कडगाव ता. बीड येथिल कोल्हापूरी बंधारा क्षतिग्रस्त झाला होता.

नाम फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंदफणा नदी पात्रातील क्षतिग्रस्त बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.मौजे कुक्कडगाव येथे जावून बंधारा दुरुस्ती आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शाळा खोली बांधकामाचा शुभारंभ केला. यावेळी नाम फाऊंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके यांच्यासह मौजे कुक्कडगाव व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेवराई विधानसभा मतदारसंघातील महापुरामुळे बाधित झालेल्या व खरडून वाहून गेलेल्या जमिनीच्या विकासासाठी अनेक ठिकाणी नाम फाऊंडेशन मदत करणार आहे. त्यांनी केलेल्या अमूल्य मदतीसाठी गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande