
सोलापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठलमूर्तीची पाहणी करून काही दिवसांपूर्वी अहवाल दिला आहे. याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यावर विठ्ठलमूर्तीवर वज्रलेप केला जाईल, अशी माहिती आहे. या आधीही विठ्ठल चरणांची झीज झाली होती. त्यावेळी वज्रलेप (रासायनिक प्रक्रिया) लावण्यात आला होता.
पंढरपूरची विठ्ठलमूर्ती ही स्वयंभू समजली जाते. भाविकांच्या चरण स्पर्शामुळे मूर्तीच्या चरणांची झीज होत आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी विठ्ठलमूर्तीची सखोल पाहणी केली होती. यानंतर मूर्तीच्या जतन व संवर्धनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला रासायनिक प्रक्रिया करण्याबाबतचा अहवालही दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड