पुणे महापालिकेत महायुतीच्या वाटाघाटींना सुरुवात
पुणे, 19 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून, भाजपने मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर कोणत्याही वाटाघाटी होणार नसल्याचे प्राथमिक सूत्र गुरुवारी भाजप व शिवसेनेच्या
PMC news


पुणे, 19 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून, भाजपने मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर कोणत्याही वाटाघाटी होणार नसल्याचे प्राथमिक सूत्र गुरुवारी भाजप व शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत ठरले आहे.

भाजपच्या ताब्यात असलेल्या १२५ जागा वगळता उर्वरित म्हणजेच विरोधकांकडील जागांवरच युतीअंतर्गत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या शिवसेनेकडे केवळ एक नगरसेवक असून, महायुतीतील वाटाघाटीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

राज्यात शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करण्याचा निर्णय झाल्यानंतर पुण्यातील एका हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा करण्यात आली. या बैठकीला भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते, तर शिवसेनेकडून उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शहरप्रमुख नाना भानगिरे सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande