पुणे : शिवसेनेकडून दोन दिवसांत भाजपला प्रस्ताव
पुणे, 19 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना यांची युती कायम ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर गुरुवारी पुण्यात भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पहिली बैठक झाली. यामध्ये जाग
पुणे : शिवसेनेकडून दोन दिवसांत भाजपला प्रस्ताव


पुणे, 19 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना यांची युती कायम ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर गुरुवारी पुण्यात भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पहिली बैठक झाली. यामध्ये जागा वाटपाबाबत निर्णय झाला नाही. मात्र, शिवसेनेने जागांबाबत त्यांचा प्रस्ताव दोन दिवसात भाजपकडे देण्याविषयीची चर्चा या बैठकीमध्ये झाली.

महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या उद्‌घाटनासाठी पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती कायम राहणार असल्याबद्दल सांगितले होते. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजप-शिवसेनेसमवेत नसेल, हेही स्पष्टपणे सांगितले होते.

यावेळी भाजपकडून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर व पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे, शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, अजय भोसले आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande