
सोलापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। दमाणीनगर रेल्वे पुलाचे पाडकाम पूर्ण झाले. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी काम बंदच ठेवण्यात आले होते.काही तास पुलाचा उर्वरित भाग पाडण्यास सुरुवात करण्यात आली. पण पूल पाडकाम करताना त्याचा काही भाग रेल्वे रूळावर पडत असल्याने काम करताना रेल्वे विभागाकडून परवानगी घ्यावी लागत होती. पाडकामाची स्थिती ‘जैसे थे’ होती. पण दोन्ही बाजूचे ते ऐतिहासिक दगड सुरक्षित काढून ठेवण्यात आले आहेत.
दमाणीनगर पुलाच्या पाडकामास १२ तासांचा ब्लॉक घेऊन पूल पाडण्यात आला. पण उर्वरित पूल पाडकामासाठीही रेल्वेकडून परवानगी मिळाल्यानंतरच काम करता येणार आहे. सोमवारी परवानगी नसल्याने काम बंद होते. मंगळवारी २ तासांचा ब्लॉक घेत काम करण्यात आले. बुधवारीही रेल्वेने परवानगी दिली नसल्याने काम बंदच होते.रेल्वेकडून ब्लॉक घेतल्यानंतरच पुढील काम करता येणार आहे. जशा सूचना मिळतील त्याप्रमाणे पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड