सोलापुरात भाजप समोर शिवसेनेची 50 जागेची डिमांड
सोलापूर, 19 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापुरात कुणालाही अपेक्षित नाही पण भाजप आणि शिवसेनेचे महायुतीसाठी पहिले पाऊल गुरुवारी पडले आहे. या बैठकीला अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण दिले गेले नसल्याचे समोर आले.महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी एकनाथ
सोलापुरात भाजप समोर शिवसेनेची 50 जागेची डिमांड


सोलापूर, 19 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापुरात कुणालाही अपेक्षित नाही पण भाजप आणि शिवसेनेचे महायुतीसाठी पहिले पाऊल गुरुवारी पडले आहे. या बैठकीला अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण दिले गेले नसल्याचे समोर आले.महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार संजय कदम हे सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी शिवसेनेची बैठक घेतली. युतीसाठी प्रयत्न करताना शिवसेनेकडून भाजपच्या शहराध्यक्षांना निमंत्रण देण्यात आले होते त्याप्रमाणे सोलापूर शहरातील हॉटेल निसर्ग येथे बैठक पार पडली.

बैठकीसाठी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या उपस्थित होत्या.यावेळी आपापल्या पक्षाची ज्या – त्या प्रभागात असलेली ताकद आणि उमेदवार याबाबत चर्चा केली. सर्वांसामान्य तोडगा काढण्यासाठी दोघेही योग्य पाऊल उचलतील असे ठरले असल्याचे समजले.राज्यात भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून जोमाने काम करत असताना सोलापुरातसुद्धा महायुती झाली पाहिजे. त्यासाठी जागांच्या बाबतीत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी दोघांकडून पहिले पाऊल टाकण्यात आले असले तरी भाजपकडून युती करण्याची मानसिकता दिसत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आता युती नको असा सूर उमटत असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. यापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युतीमधून 25 जागेची मागणी केली होती परंतु आता एकूणच भाजपची वाटचाल पाहता शिवसेना पन्नास जागेवर अडून बसल्याचे समजते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande