सोलापुरात राष्ट्रवादीकडे १७५ इच्छुकांचे अर्ज
सोलापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापूर शहरात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गुरुवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १७५ इतक्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अजितदादा पवारांच्या राष्ट्र
सोलापुरात राष्ट्रवादीकडे १७५ इच्छुकांचे अर्ज


सोलापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापूर शहरात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गुरुवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १७५ इतक्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तीन दिवसात तब्बल रेकॉर्डब्रेक अशा तब्बल ४१२ जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्यामुळे सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादी पक्षाची सोलापुरातील ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस, एमआयएम पक्षामधील माजी उपमहापौर तसेच माजी गटनेते माजी नगरसेवकांनी आपापल्या पक्षाला धक्का देत अजित पवारांच्या पक्षाकडून महानगरपालिकेसाठी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री माजी स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी, माजी नगरसेवक रियाज खैरदी, माजी परिवहन सभापथी राजन जाधव, माजी नगरसेविका लता फुटाणे, माजी नगरसेवक विवेक खरटमल, माजी नगरसेवक मृणाल पाटील माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेवक वाहेदाबी शेख, माजी नगरसेवक वाहिद नदाफ, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम तसेच राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचे बंधू हरीष बागवान यांच्यासह शेकडो इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादीकडून वाजत गाजत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande