दिलीप मानेंच्या प्रवेशाला मी होकार दिलेला नाही - सुभाष देशमुख
सोलापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या भाजप प्रवेशामुळं आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या संदर्भात सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
Subhash deshamukha


सोलापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या भाजप प्रवेशामुळं आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या संदर्भात सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्यांना कोणतेही तिकीट दिले जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मग जर तिकीट द्यायचं नसेल तर हा प्रवेश का घेतला? असा सवाल सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाला मी एक टक्के देखील होकार दिलेला नाही असे देशमुख म्हणाले.

मला काही माहिती नाही, पालकमंत्री बोलले होते की मला विचारात घेतलं जाईल. पण मला या संदर्भात काहीही माहिती नाही, तुम्ही हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारा असे देशमुख म्हणाले. भाजप वाढावा ही आमची देखील भावना आहे. 2004 मध्ये सोलापूरच्या जनतेने मला काही नसताना खासदार केलं होतं. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत माढ्यात गेलो होतो. पवार साहेबांचा विरोधात देखील मी चांगली मतं मिळवली होती. पार्टी वाढली पाहिजे यासाठी प्रवेश होतात. पण काही फीडबॅक चुकीचे जातायत असं मला वाटत असल्याचे सुभाष देशमुख म्हणाले. सोलापूर महापालिकेत दोन्ही देशमुखांनी मिळून 49 नगरसेवक आणले होते. सोलापूर मध्यला तर आमचा आमदार देखील नव्हता असे देशमुख म्हणाले. पक्ष संघटना, नेते हे एखाद्याला उमेदवारी देतात. त्या उमेदवाराचा प्रचार करणे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे. प्रवेश झालेला आहे आता आम्ही कार्यकर्त्यांना हा निरोप कळवू. कार्यकर्ते, नागरिक हा निर्णय स्वीकारतात का बघू असे देशमुख म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande