परभणीत चौकशी अधिकाऱ्यासमोर अर्जदाराला मारहाण
परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)।कौसडी ग्रामपंचायतने केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत तक्रारीच्या चौकशीसाठी अधिकारी आले असता त्या ठिकाणी सरपंच व सदस्यांनी अर्जदारांना मारहाण केल्याची घटना घडली. कौसडीतील काही कामांची तक्रार काही ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्य
परभणीत चौकशी अधिकाऱ्यासमोर अर्जदाराला मारहाण


परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)।कौसडी ग्रामपंचायतने केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत तक्रारीच्या चौकशीसाठी अधिकारी आले असता त्या ठिकाणी सरपंच व सदस्यांनी अर्जदारांना मारहाण केल्याची घटना घडली.

कौसडीतील काही कामांची तक्रार काही ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. त्यानुसार चौकशीसाठी अधिकारी आले असता त्यांच्यासमोर सरपंच शेख मोबीन कुरेशी व ग्रा.पं. सदस्य आवेस शेख हाफीज यांनी तक्रारदार शेख बिलालोद्दीन शेख मुजाहिद यांच्यामध्ये वाद होऊन हाणामारीची घटना घडली. यातील काही जखमींना बोरी रुग्णालयामध्ये दाखल केले. यामुळे दोन गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे भांडण उपस्थित ग्रामस्थांनी सोडवले. याबाबत रात्रीपर्यंत बोरी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande