अमरावती महानगरपालिकेत निवडणूक पूर्वतयारीसाठी बैठक
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) ।महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये निवडणूक अधिकारी व महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नियंत्रण अधिकारी,
अमरावती महानगरपालिकेत निवडणूक पूर्वतयारीसाठी बैठक बैठकीत नियंत्रण अधिकारी, सहाय्यक अधिकारी यांची उपस्थिती


अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) ।महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये निवडणूक अधिकारी व महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नियंत्रण अधिकारी, सहाय्यक अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत विविध निवडणूक संबंधित कामकाजाचे सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये कामावर देखरेख व नियंत्रण, आचारसंहिता कक्षाचे व्यवस्थापन, कायदा सुव्यवस्था, तसेच FST, SST, VST आणि VVT या पथकांचे नियोजन व कार्यक्षम नियंत्रण या बाबींचा समावेश होता. तसेच पोलीस बंदोबस्त, CVIGIL व ESMS प्रणालीतील कामकाज आणि तक्रार कक्षाचे स्थापत्य व नियंत्रण यावरही विशेष भर देण्यात आला. बैठकीत एक खिडकी सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदान व मतमोजणी कर्मचारी व्यवस्थापन, मतमोजणी केंद्र व Strong Room व्यवस्थापन, Sveep Plan, मतदार केंद्र व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण, साहित्य पुरवठा आणि आवश्यक फॉर्मच्या छपाई व वितरण याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर EVM इंचार्ज व संबंधित साहित्याचे वाटप, फर्निचर पुरवठा, खर्चाचा हिशोब, लेखा परिक्षण, MCMC जाहिरात प्रमाणन, माहिती कक्ष व्यवस्थापन, स्थायी समिती हॉल व्यवस्थापन, अहवाल सादरीकरण, पत्रव्यवहार, PPT व Observer नोट्स तयार करणे, संगणकीकरण, माहिती संकलन व रिपोर्ट तयार करणे या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राची स्वच्छता तसेच मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भोजन व्यवस्था आणि इतर सुविधा यावरही बैठक काळजीपूर्वक थांबून चर्चा केली. तसेच झोन कार्यालय व्यवस्थापन व कर्मचारी व्यवस्थापन याबाबत नियोजनाचा आढावा घेतला. निवडणूक अधिकारी व महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सर्व बाबतीत सतत नियंत्रण ठेवण्याचे आणि वेळेवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक पायरीवर नीट नियोजन, सुरक्षितता व पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक आहे. ही बैठक अमरावती महानगरपालिकेतील निवडणूक तयारीतर्फे घेतलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा असून, आगामी निवडणुकीत पारदर्शक, सुरक्षित व सुचारू मतदान प्रक्रियेची सुनिश्चितता करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande