मतदान टक्केवारी वाढविण्याकरिता नव मतदारांना साद
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) । महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकि2025-26 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता अमरावती महानगपालिका sveep विभागा मार्फत विविध उपक्रम राबविले जातं आहेत त्याचाच एक भाग म्हणून नव मतदारांना आव्हान करण्याकरिता सौम्या शर्म
मतदान टक्केवारी वाढविण्याकरिता नव मतदारांना साद मतदानाचा वाढावा टक्का महानगरपालिकेचा निर्धार पक्का


अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) । महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकि2025-26 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता अमरावती महानगपालिका sveep विभागा मार्फत विविध उपक्रम राबविले जातं आहेत त्याचाच एक भाग म्हणून नव मतदारांना आव्हान करण्याकरिता सौम्या शर्मा चांडक, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनात sveep विभागाच्या वतीने श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मतदानाची शपध हा उपक्रम राबविला गेला यामध्ये 500 विद्यार्थ्यांना मतदानाची शपध देण्यात आली.तसेच मतदान करणे का आवश्यक आहे याबदल माहिती देऊन मतदानाचे महत्व या माध्यमातून सर्वापर्यंत पोहचण्याचाच प्रयत्न केला जातं आहे. याकरिता sveep नोडेल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी डॉ प्रकाश मेश्राम, पंकज कुमार सपकाळ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,श्री साबळे सर प्रभारी प्राचार्य, योगेश पखाले शाळा निरीक्षक, कैलास कुलट, उज्वल जाधव, योगेश राणे, संजय बेलसरे, निजामउद्दीन काझी, शुभांगी सुने, सुषमा दुधे, सुमेश वानखडे हे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande