
छत्रपती संभाजीनगर, 20 डिसेंबर (हिं.स.) । जिल्हयातील ४१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी ’रोबेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये सहभाग घेऊन नाविण्यपूर्ण प्रयोग साकारले. यंत्रमानव, स्मार्ट डस्टबीन, स्मार्ट कॅप, फायर फायटर रोबो, सेंसर मोटार यंत्र आदी प्रयोगांनी लक्ष वेधले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अटल इन्क्यूबूशन सेंटर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इन्क्यूबूशन सेंटरच्या प्रांगाणात रोबोटिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील ४१ शाळांमधील ३५० विद्यार्थी सहभागी झाली. निती आयोग अंतर्गत ’अटल इन्क्यूबेशन मिशन’च्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये ’स्टार्ट अप’, संशोधन व नवोन्मेष याविषयी जागृती व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ’सिफार्ट’च्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. योवळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ वासुदेव साळुंके, अटल इन्क्यूबूशन सेंटरचे संचालक डॉ.प्रवीण वक्ते, सीईओ अमित रंजन, ’रोबोटिक्स’चे दीपक कोलते आदींची उपस्थिती होती. यावेळी निती आयोगाचे प्रकल्प संचालक प्रतिक देशमुख, कार्यक्रम संचालक दीपाली उपाध्याय हे ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाली. यज्ञ अर्थात युथ अॅक्सन्मेटेशन ग्रोथ सिस्टीम अॅस्पिरेशन्स आणि स्कूल स्टूटडटंस् इनोव्हेशन प्रोगाम (एसएसआयपी) हे दोन उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहेत, असे संचालक डॉ.प्रवीण वक्ते यांनी सांगितले. उत्कृष्ट प्रयोगांना अटल सेंटरच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले. दिवसभरात शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी प्रदर्शनास भेट दिली.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis