
बीड, 22 डिसेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राजकिशोर मोदी यांना मोठा झटका बसला आणि त्यांचा पराभव झाला. आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे निवडून आले. गेल अनेक वर्षापासून ची मोदी यांची सत्ता संपली.
या पराभवानंतर राज किशोर मोदी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे की, अंबाजोगाईकच्या मायबाप जनतेने दिलेला कौल मला पूर्णपणे मान्य आहे. लोकशाहीत जनतेचा निर्णय अंतिम असतो, आणि त्या निर्णयाचा मनापासून आदर करतो. या निवडणुकीत तब्बल २०,२८० मतदारांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्या विश्वासाबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. तसेच लोकविकास महाआघाडीच्या वतीने निवडून आलेल्या आमच्या २० नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन.
पद असो वा नसो, अंबाजोगाई हेच माझं कुटुंब आहे. शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या अडचणी,न्यायासाठी मी यापुढेही तितक्याच प्रामाणिकपणे काम करत राहीन. संघर्ष थांबत नाही, सेवा थांबत नाही अंबाजोगाईकरांसाठीचं माझं काम अविरत सुरू राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis