राजकीय द्वेषातून बदनाम केलेल्या सर्वांनाच इथल्या जनतेने मतांमधून चोख प्रत्युत्तर दिले- आ. धनंजय मुंडे
बीड, 22 डिसेंबर (हिं.स.)। परळी वैद्यनाथ नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल राष्ट्रव
बीड


बीड, 22 डिसेंबर (हिं.स.)। परळी वैद्यनाथ नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी सर्व जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. मुंडे म्हणाले की, मागील काही काळात परळीच्या मातीला आणि मातीतल्या माणसाला राजकीय द्वेषातून बदनाम केलेल्या सर्वांनाच इथल्या जनतेने मतांमधून चोख प्रत्युत्तर दिले आहे, याचा मनस्वी आनंद व अभिमान वाटतो.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारताना या निवडणुकीत माझ्या परळीकरांना दिलेला प्रत्येक शब्द आठवून तो पूर्ण करण्याचे अभिवचन पुन्हा एकदा देतो.

या निवडणुकीसाठी पाठबळ दिलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, ना. पंकजाताई यांच्यासह विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे, स्वतःची निवडणूक समजून काम करणाऱ्या माझ्या प्रत्येक सहकाऱ्याचे तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे मनस्वी अभिनंदन व आभार!

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande