
छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. छत्रपती संभाजी नगर
शहर जिल्हा निवड मंडळाची बैठक व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे पार पडल्या. यावेळी पक्ष निरीक्षक वसाहत मिर्झा व खासदार डॉक्टर कल्याण काळे शहराध्यक्ष शेख युसूफ जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आदी निवड समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीदरम्यान शहर जिल्ह्यातील विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवारांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या.
यावेळी निवड मंडळाच्या वतीने उमेदवारांना मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक घरोघरी पोहोचवावी तसेच जनतेमध्ये प्रत्यक्ष संपर्कातून विश्वास संपादन करावा. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तळागाळात जाऊन काम करण्याचे निर्देशही इच्छुक उमेदवारांना देण्यात आले.
या प्रक्रियेमुळे काँग्रेस पक्ष अधिक सक्षमपणे जनतेसमोर जाण्यास सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis