महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध
जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.) | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ ची पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध


जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.) | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ ची पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा रविवार, २३ नोव्हेंबर रोजी राज्यभर घेण्यात आली होती.

या परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्न अथवा पर्यायी उत्तराबाबत उमेदवारांना आक्षेप असल्यास, ते आक्षेप २७ डिसेंबर २०२५ अखेर पर्यंत पाठविता येतील केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहेत.

यासाठी उमेदवारांनी आपल्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी लिंकचा वापर करावा. ऑनलाईन पद्धतीशिवाय टपाल, ई-मेल किंवा समक्ष सादर करण्यात आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विषयतज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार विचार करून अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande