
छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षातील कार्यकर्ते आणि नेते इतर पक्षात देखील प्रवेश करू लागले आहेत. अनेक वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट कामाला लागले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळे संपन्न होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकृष्ण नगर, प्रभाग क्रमांक २१ मधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाची एकजूट अधिक भक्कम होत असून संघटन बळकट झाले आहे.येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी एकजुटीने, निष्ठेने व जोमाने काम करून महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत, शहराच्या विकासासाठी एकत्रित लढा उभारण्याचा संकल्प करत सर्वांनी पक्षप्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis