
छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)। रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून समाजात सेवा, सहकार्य व माणुसकीची भावना अधिक बळकट होत आहे. असे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
सन्त निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर श्री जागृत हनुमान मंदिर, मोरे चौक, बजाजनगर, वाळुज एम.आय.डी.सी., छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले. या उपक्रमातून मानवतेचा संदेश देत अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.
-------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis