
अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.)| न. प. निवडणुकीच्या निकालात शिंदे शिवसेनेच्या प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने या ७ हजार २३० मते घेऊन नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. दुसऱ्या क्रमांकावरील मोर्शी शहर विकास आघाडीच्या सोनल रोडे यांना ५ हजार ८०१, तर तिसऱ्या क्रमांकवरी भाजपाच्या रेशमा नितीन उमाळे यांना ५ हजार २६ मते मिळाली.
नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर २४ नगरपालिका सदस्यांकरिता १२७ उमेदवार उभे होते. यात भाजपा ६, शरद पवार गटाचे ६, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ५, अजित पवार गटाचे २, शिंदे गटाचे २ आणि प्रहारचा १ उमेदवार विजयी झाला. याशिवाय अपक्ष दोन उमेदवार विजयी झाले.
विजयी झालेल्या नगरसेवकांमध्ये शरद पवार गटाचे - डॉ. प्रदीप कुन्हाडे, साबिया अर्शी शेख इरफान, विद्या विनोद ढवळे व नीलेश गुलाबराव महल्ले.
काँग्रेसच्या राखी गौरव खेरडे, सागर ठाकरे, शरद पवार गटाच्या कांचन वैभव भोजने व आनंद सदातपुरे, अपक्ष दीपाली बडोदेकर, काँग्रेसचे सागर कोकाटे, शिवसेना शिंदे गटाचे अमन गायकी, भाजपाच्या सुनीता सुनील कोहळे, प्रीती ब्रह्मानंद देशमुख, हर्षल हरिभाऊ चौधरी, काँग्रेसचे उमेदवार रवी रामू परतेती, भाजपाच्या मोनाली भास्कर फंदे, शिवसेना शिंदे गटाचेरवींद्र रामकृष्ण गुल्हाने, अपक्ष प्रभा कैलास फंदे, प्रहार जनशक्तीचे नईम खान रहमतुल्ला खान, राष्ट्रीय काँग्रेसच्या कमरुन्निसा शेख शब्बीर, भाजपाच्या जयश्री संजीव आगरकर, नितीन भीमराव पन्नासे, अजित पवार गटाचे अंकुश भोजराज घारड, प्रीती राहुल देशमुख यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी