अमरावती शहरात तोडफोड व दहशत करणाऱ्यां गुंडांची पोलिसांनी काढली धिंड
अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.) | मंथन पाळनकरच्या हत्येनंतर त्याच्या काही मित्रांनी परिसरात गोंधळ घातला तसेच घातकशस्त्रे घेवून वाहनांची तोडफोड करून काही नागरिकांना मारहाण केली होती. त्यामुळे रविवारी राजापेठ पोलिसांनी अटकेतील सात आरोपींची पूर्ण परिसरात
शहरात तोडफोड व दहशत करणाऱ्यां गुंडांची पोलिसांनी काढली  धिंड


अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.) | मंथन पाळनकरच्या हत्येनंतर त्याच्या काही मित्रांनी परिसरात गोंधळ घातला तसेच घातकशस्त्रे घेवून वाहनांची तोडफोड करून काही नागरिकांना मारहाण केली होती. त्यामुळे रविवारी राजापेठ पोलिसांनी अटकेतील सात आरोपींची पूर्ण परिसरात धिंड काढली. तसेच ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी तोडफोड केली आणि नागरिकांना मारहाण केली त्या प्रत्येक ठिकाणाची पाहणी केली.

या गुंडांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.मंथन पाळनकरची शुक्रवारी हल्लेखोरांनी हत्या केली होती. त्यानंतर मंथनच्या १० ते १५ साथिदारांनी त्याच रात्री घातक शस्त्रे घेवून परिसरात धुमाकूळ घातला. दुचाकीवर बसून आणि हातात तलवारी व चाकू घेऊन केडीयानगर, शंकरनगर, मायानगर, गोपालनगर, परिसरातील काही वाहनांची तोडफोड केली. तसेच ये-जा आदर्शनगर करणाऱ्या नागरिकांना मारहाण करीत धमकी दिली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांत चांगलीच दहशत निर्माण झाली होती.

गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहली नाही अशी चर्चा नागरिकात होती. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी त्याच रात्री तोडफोड करणाऱ्या १२ आरोपींना अटक करून पाच अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली.अटकेतील आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेतील आराींनी केलेले कृत्य पाहता राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांनी रविवारी सायंकाळी सात वाजता आरोपींची पायी धिंड काढली.

ज्या ठिकाणी आरोपींनी तोडफोड केली होती त्यासर्व ठिकाणी त्यांना नेले आणि पाहणी केली. ज्या घरांवर आरोपींनी दगडफेक केली होती त्यांच्यासमोर आरोपींना कान पकडून माफी मागायला लावली. केडीयानगर, शंकरनगर, गोपालनगर, आदर्शनगर या परिसरात आरोपीची दहशत आहे. त्यामुळे यापूर्ण परिसरात त्यांना पायी फिरविण्यात आले. लहान मुलांसह महिला व पुरुषांनी आरोपींना पाहण्याकरिता एकच गर्दी केली होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकात चांगला संदेश गेला असून पोलिसांची प्रतीमा वाढली आहे. तसेच नागरिकांची हिम्मत सुध्दा वाढलेली दिसून आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande