विजय हजारे ट्रॉफी : सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे मुंबईकडून दोन सामने खेळणार
नवी दिल्ली, 23 डिसेंबर (हिं.स.)भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफीच्या गट टप्प्यात मुंबईकडून खेळण्याची शक्यता आहे. दोन्ही क्रिकेटपटूंनी मुंबईच्या शेवटच्या दोन गट सामन्यांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
सूर्यकुमार यादव


नवी दिल्ली, 23 डिसेंबर (हिं.स.)भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफीच्या गट टप्प्यात मुंबईकडून खेळण्याची शक्यता आहे. दोन्ही क्रिकेटपटूंनी मुंबईच्या शेवटच्या दोन गट सामन्यांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सूर्यकुमार आणि शिवम अनुक्रमे ६ आणि ८ जानेवारी रोजी जयपूरमध्ये होणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. दोन्ही क्रिकेटपटू अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताकडून खेळले होते. ज्यामध्ये भारताने ३-१ असा विजय मिळवला होता.

मुंबईला पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोवा यांच्यासह गट क मध्ये स्थान देण्यात आले आहे. शिवाय, भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल देखील स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये खेळण्याची अपेक्षा आहे. जयस्वालने अलीकडेच राजस्थानविरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यात ६७ आणि १५६ धावा केल्या. तो सध्या गॅस्ट्र्रिटिसपासून बरा होत आहे.

रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीचे सुरुवातीचे दोन सामने खेळणार आहे. यासाठी तो जयपूरमध्ये दाखलही झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहितल या स्पर्धेत आपल्या फलंदाजाची जादू पुन्हा एकदा दाखवण्याची नामी संधी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande