नेमारची शस्त्रक्रिया यशस्वी; २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी ब्राझील संघात परतण्याची आशा
साओ पावलो, २३ डिसेंबर (हिं.स.) ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारच्या डाव्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. नेमारला मेनिस्कस दुखापत झाली होती, ज्यासाठी आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आवश्यक होती. नेमारचा फुटबॉल क्लब सॅंटोसने या वृत्ताला दुजोरा
फुटबॉलपटू नेमार


साओ पावलो, २३ डिसेंबर (हिं.स.) ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारच्या डाव्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. नेमारला मेनिस्कस दुखापत झाली होती, ज्यासाठी आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आवश्यक होती.

नेमारचा फुटबॉल क्लब सॅंटोसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ३३ वर्षीय नेमारसाठी हा हंगाम आव्हानात्मक राहिला आहे. त्याने दुखापतींमधूनही खेळ केला आणि ब्राझीलच्या टॉप लीगमध्ये सॅंटोसला रेलीगेशनपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली होती. ज्यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये उरुग्वेविरुद्धच्या सामन्यादरम्यान नेमारच्या पायाच्या फ्रॅक्चर आणि एसीएल (अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट) फाडण्यावर शस्त्रक्रिया केली होती.

नेमार सुमारे एक महिन्यात तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. सॅंटोससोबतचा त्याचा सध्याचा करार वर्षाच्या अखेरीस संपत आहे. जरी क्लबसोबत नवीन करारासाठी वाटाघाटी सुरू आहेत.बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा माजी स्टार नेमार गेल्या दोन वर्षांपासून ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाकडून खेळलेला नाही. पण २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी तो प्रशिक्षक कार्लो अँसेलोटीच्या योजनांमध्ये असेल अशी आशा आहे. नेमार हा ब्राझीलचा सर्वकालीन आघाडीचा गोलस्कोअरर आहे, त्याने १२८ सामन्यांमध्ये ७९ गोल केले आहेत.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande