
पुणे, 23 डिसेंबर (हिं.स.)महिलांच्या आरोग्य विषयक व्यापक जनजागृती आणि ग्रामीण, दुर्गम भागातील गरीब गरजू मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी वुमन्स चॅरिटी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या नॅपकिन्सचे मोफत वाटप राज्यभरातील गरजू मुलींना करण्यात येणार आहे.
कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने संगिता ताई तिवारी यांच्या बिटीया फाउंडेशन च्या सहयोगाने व संकेत शिंदे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील खेळाडू आणि प्रेक्षकांना सॅनिटरी नॅपकिन्स आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद लाभला असून 20 हजार 500 सॅनिटरी नॅपकिन्स गोळा झाले, गरजू महिला, मुलींना त्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या टीमनेही सॅनिटरी नॅपकिन्सची मदत दिली.
खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत पोलीस, वकील, सनदी लेखापाल, महापालिका कर्मचारी, मॉडेल्स, सामाजिक कार्यकर्त्या,पत्रकार अशा एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेत बिटिया फाउंडेशन गुलाबो गँग विजेता ठरली, तर उपविजेता SGC चार्टर्ड चॅम्पियन्स (CA) ठरले. तर विशेष खेळाडू म्हणून रुपाली पाटील ठोंबरे यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे मुख्य आयोजक पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार होते.तर उद्योजक कृष्णकुमार गोयल, सूर्यादत्त ग्रुपचे डॉ संजय चोरडिया, संकेत शिंदे, डॉ महेश थोरवे, स्वाती झुंगरे, राज रणदिवे, समिता ताई गोरे, संगीता तिवारी यांनी संघमालक म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी मिलिंद जोशीराव,सीए डॉ केतन जोगळेकर,सारिका जोगळेकर, संग्राम पवार,सचिन भैया धिवार, गौरव लखानी,सूरज ढोपे,हुसैन चेचडवला,तेजपाल वाघ,गौरवराज, ऋषिकेश बालगुडे,चेतन चावडा,केतन धावडे,किरण कामठे आदि मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे