अमरावती - दस्तूर नगर–वडाळी परिसरातील चर्चमध्ये क्रिसमस साजरा
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) झोन क्रमांक चार अंतर्गत दस्तूर नगर व वडाळी परिसरातील चर्चमध्ये आज क्रिसमस दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना क्रिसमस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान अमरावती महानगर
दस्तूर नगर–वडाळी परिसरातील चर्चमध्ये क्रिसमस साजरा; मतदार हक्काबाबत शपथ व मार्गदर्शन


अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) झोन क्रमांक चार अंतर्गत दस्तूर नगर व वडाळी परिसरातील चर्चमध्ये आज क्रिसमस दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना क्रिसमस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमादरम्यान अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपला मतदार हक्क बजावावा, यासाठी विशेष शपथ घेण्यात आली. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व, जबाबदार नागरिक म्हणून सहभाग आणि निर्भय व निष्पक्ष मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

तसेच उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाची नोंदणी, मतदानाचा दिवस, तसेच मतदान करताना पाळावयाच्या नियमांची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र दिसून आले.सामाजिक एकोपा, लोकशाही मूल्ये आणि नागरी कर्तव्य यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande