अमरावती महानगरपालिकेत निवडणूक तयारीचा सखोल आढावा
अमरावती, 25 डिसेंबर, (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आज गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेतील निवडणूक विषयक कामकाजाची सखोल पाहणी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज राहावे, या उद्द
अमरावती महानगरपालिकेत निवडणूक तयारीचा सखोल आढावा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांची विविध विभागांना भेट, महत्त्वपूर्ण सूचना


अमरावती, 25 डिसेंबर, (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आज गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेतील निवडणूक विषयक कामकाजाची सखोल पाहणी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज राहावे, या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली.

या पाहणीदरम्यान महानगरपालिकेतील माहिती कक्ष, निवडणूक विभाग, भांडार विभाग तसेच नगरसचिव विभाग येथे सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विभागातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून निवडणूक संदर्भातील तयारी, कागदपत्रांची स्थिती, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक साहित्याबाबत माहिती जाणून घेतली.

माहिती कक्षामध्ये निवडणूक संदर्भातील माहिती संकलन, नोंदी व तांत्रिक तयारीची पाहणी करत त्यांनी माहिती वेळेत व अचूक उपलब्ध राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक विभागात मतदार यादी, कर्मचारी नेमणूक, प्रशिक्षण व निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत चर्चा करण्यात आली.भांडार विभागामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले साहित्य, उपकरणे व इतर साधनसामग्री उपलब्धतेची तपासणी करण्यात आली. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, यासाठी आधीच योग्य नियोजन करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी दिले.नगरसचिव विभागात निवडणूक संबंधित अधिसूचना, पत्रव्यवहार व कायदेशीर बाबींचा आढावा घेण्यात आला. सर्व कामकाज नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडले जावे, तसेच सर्व नोंदी अद्ययावत ठेवण्यात याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. कोणतीही त्रुटी किंवा विलंब होऊ नये यासाठी जबाबदारीने काम करण्यावर त्यांनी भर दिला.या पाहणीमुळे अमरावती महानगरपालिकेतील निवडणूक तयारीला अधिक गती मिळणार असून प्रशासन अधिक सक्षमपणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सज्ज असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.या पाहणी दरम्यान शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, नगरसचिव संदिप वडुरकर, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande