अटल दौड राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत धावले 2164 धावपटू
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत गुरुवारी सक
अटल दौड राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत धावले 2164 धावपटू


अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)

माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत गुरुवारी सकाळी हजारो स्पर्धक धावले त्यामध्ये पुरुष गटातून राज तिवारीला टीव्हीएस स्पोर्ट तर महिला गटातून साक्षी जडयाल हिला टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी पुरस्कार म्हणून देण्यात आली.

या स्पर्धेत राज्यभरातून 2164 धावपटूंनी सहभाग घेतला सहभाग घेतला, स्थानिक दसरा मैदान येथे स्पर्धेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली.या स्पर्धेमध्ये 21 किलोमीटर 10 किलोमीटर 8 किलोमीटर 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर व रन फोर अमरावती खुला गट अंतराच्या शर्यती पार पडल्या, या स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील विविध संघटनांनी सहभाग नोंदवला.यावेळी मुख्य आयोजक तुषार भारतीय, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, माजी महापौर चेतन गावंडे अथलेटिक्स संघटनेचे सचिव प्राध्यापक अतुल पाटील,ऋषी खत्री, प्रशांत शेगोकार,सचिन मोहोड, डॉक्टर शाम राठी, डॉक्टर मिलिंद पाठक यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली.धावपटू दसरा मैदान ,राजापेठ ,कव्हर नगर, फरशी स्टॉप ,दस्तूर नगर ,यशोदा नगर ,काँग्रेस नगर ,बियाणी चौक ,वेलकम पॉइंट, पंचवटी चौक, राठी नगर, शेगाव नाका येथून दसरा मैदान येथे पोहोचले.

स्पर्धेअंती सर्व गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम,प्रमाणपत्र, व मेडल प्रदान करण्यात आली.अटलदौड हाफ मॅरेथॉन स्पर्धा दरवर्षी विविध गटांमध्ये आयोजित करण्यात येते.स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून धावक अमरावतीमध्ये रात्रीच दाखल झाले, त्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था व्यवस्थापन समितीतर्फे लोहाना महाजन वाडी, येथे करण्यात आली स्पर्धकांना धावताना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक चौकात स्पर्धकांचे स्वागत व इतर साहित्यांची व्यवस्था करण्यात आली अतिशय नियोजनबद्ध आणि सुरळीत स्पर्धा पार पाडण्यासाठी स्पर्धेच्या मार्गावर पाणी औषधे वेदनाशक स्प्रे इत्यादी व्यवस्था करण्यात आली.यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त, वाहतूक पोलीस, तसेच मोठ्या प्रमाणात शिक्षक ,पाचशेच्या अधिक स्वयंसेवक स्पर्धेच्या मार्गावर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande