परभणीत ट्रॅक्टर - दुचाकी अपघातात युवक जागीच ठार
परभणी, 25 डिसेंबर (हिं.स.)। ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातामध्ये एका २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुर्णा ते ताडकळस राज्य रस्त्यावर गुरूवारी(दि. २५) दुपारी घडली असून या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध विरुद्ध पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल
ट्रक्टर - दुचाकी अपघातात युवक जागीच ठार


परभणी, 25 डिसेंबर (हिं.स.)।

ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातामध्ये एका २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुर्णा ते ताडकळस राज्य रस्त्यावर गुरूवारी(दि. २५) दुपारी घडली असून या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध विरुद्ध पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील मयत युवक ज्ञानेश्वर सटवाची बोकारे(वय २५)हा युवक दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पूर्णा शहरातून गावाकडे दुचाकीने जात असताना कानडखेड परिसरात बळीराजा साखर कारखाना परिसरात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकी चालक जागीच मृत्यू पावला. घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाहणी करून पंचनामा केला.अपघाताच्या या घटनेमुळे फुकटगाव गावावर सोहळा पसरली आहे. मयत ज्ञानेश्वरच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे. गुरूवारी सायंकाळी उशिरा फुकटगाव येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande