
अकोला, 25 डिसेंबर (हिं.स.)।
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील अवैध्य धंद्यावर मिशन प्रहार कार्यवाही प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशीत केल्याने करणे असल्याने आज रोजी सकाळी दरम्यान पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला हददीतील मच्छि मार्केट कागजीपुरा मस्जिदच्या मागील गल्लीतील मोबीन कुरैशी यांचे घरा समोर गौवंश जातीचे जनावरे निर्देयतेने कत्तली करीता बांधून ठेवलेली आहे. अशा खात्रीशीर माहिती वरून घटनास्थळावर पंचासह जावुन पाहणी करून गोवंश जातीचे १६ जनावरे निर्देयतेने कत्तली करीता बाधलेली दिसली सदर गोवंश जातीचे जाणवरे हि आरोपी नामे शेख मोबिन शेख मुनताज कुरेशी रा. मच्छी मार्केट अकोला यांचे असल्याची माहिती मिळाल्या वरून त्यांच्या ताब्यातुन १६ गोवंश जातीचे जनावरे एकुण कि.अ.३,९५,०००/-रू चा मुदेदमाल पंचासमक्ष घटनास्थळा वरून जप्त करण्यात आले. वरून पोस्टे. अप.न. ३७९/२०२५ कलम ५, ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षणा कायदा सहकलम ११ प्राण्याचा छळ प्रतिबंध अधि, गुन्हा दाखल करून गोवंशाना जिवनदान देण्यास पोलीसांनी मोलाचे कर्तव्यपार पाडले. सदर चे जप्त गोवंश जातीचे जनावरे पुढील संगोपण व देखरेख करिता आदर्श गोसेवा संस्था म्हैसपुर अकोला यांचे ताब्यात देण्यात आले.
तसेच येणा-या महानगर पालीका निवडणूक ही पारदर्शक व र्निव्यसनी नशामुक्त करण्याचे उददेशाने पो.स्टे. हददीतील सुरू असलेले अवैध्य दारूचे धंदयावर धडक कार्यवाही प्रमाणे सकाळी १०/०० वा. गवळीपुरा येथील अवैध गावठी हातभटटी दारू विक्री करणारा आरोपी यावेवर रेड कार्यवाही करण्यात आली ज्यामध्ये गावठी हातभटटी दारू व गाढण्यासाठी लागणारे साहीत्यसह एकूण ५०,६००/रूपयाचा मुददेमाल मिळून आला. नमुद आरोपी याचेवर गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला. असा एकूण ४,४५,६००/रू मुददेमाल जप्त करण्यात आला आरोपीतांवर कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई शिरीष खंडारे यांचे मार्गदर्शणाखाली पो.उप.नि.निलेश गायकवाड, पो. हवा. दादाराव टापरे, पो. कॉ. श्याम मोहळे, अनिल धनभर, इमाम चौधरी, अभिजीत इंगळे, वाहण चालक सुरेंद्र खंडारे सर्व नेमणुक रामदापेठ, अकोला यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे