
अकोला, 25 डिसेंबर (हिं.स.)।समाजातील उपवर युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा व समाजातील सुसंवाद वृद्धिंगत व्हावा यासाठी उपवर युवक-युवती परिचय मेळावे अत्यंत उपयुक्त असून युवक-युवतींना तसेच पालकांनाही एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यामुळे समाजाने एकत्र येऊन असे उपक्रम राबविणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी आज केले.
अखिल भारतीय कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे उपवर युवक युवती परिचय मेळावा जि प कर्मचारी भवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. खामगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अपर्णाताई फुंडकर व हिवरखेडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुलभाताई दूतोंडे यांचा गौरव यावेळी करण्यात आला, तसेच सोयरीक पुस्तिका व दिनदर्शिकेचे प्रकाशनही झाले.माजी जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे,माजी आमदार नारायणराव गव्हाणकर,सागर फुंडकर,भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर,अखिल भारतीय कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच उपवर युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मेळाव्याच्या माध्यमातून सुसंवाद वाढीस लागतो. अ. भा. कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अनेक चांगले उपक्रम राबवत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी केले.अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे