अचलपूर नगर परिषदेत काँग्रेस मोठा पक्ष, 15 नगरसेवकांसह ऐतिहासिक विजय
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अचलपूर नगरपरिषद निवडणूक काँग्रेससाठी ऐतिहासिक ठरली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ४१ पैकी सर्वाधिक १५ नगरसेवक निवडून आण
अचलपूर नगर परिषदेत काँग्रेस मोठा पक्ष, 15 नगरसेवकांसह ऐतिहासिक विजय


अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)।

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अचलपूर नगरपरिषद निवडणूक काँग्रेससाठी ऐतिहासिक ठरली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ४१ पैकी सर्वाधिक १५ नगरसेवक निवडून आणत नगरपरिषदेत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्षपद भाजपाकडे गेले असले तरी संख्याबळ, संघटनशक्ती आणि जनाधाराच्या जोरावर अचलपूर नगरपरिषदेवर काँग्रेसचाच दबदबा निर्माण झाला आहे. अचलपूरमधील या यशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून काँग्रेसची ताकद अधिक भक्कमझाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यशाची ही लाट अचलपूरपुरती मर्यादित न धारणी राहता नगरपंचायतीत काँग्रेसचे ८ नगरसेवक तर अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत सर्वाधिक ९ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले आहेत. त्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्वठळकपणे अधोरेखित झाले आहे.

नेतृत्व, नियोजन आणि कार्यकर्त्यांची मेहनत फळाला

अचलपूर नगरपरिषदेतील हे यश जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या प्रभावी नियोजन, मजबूत संघटन कौशल्य आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अथकमेहनतीचे फलित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रत्येक प्रभागात स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत काँग्रेसने मतदारांचा विश्वास संपादन केला.

निवडून आलेले काँग्रेस नगरसेवकहिना कौसर खाजे खाँ, मो. राजीक मो. सादीक, मारिया अंजुम मो. अफजल, मो. असलम वंजारा, अ. सलीम अ. सादीक, कलीम शाह शब्बीर शाह, सुमय्या बखतीयार रऊफ खान, मो. शब्बीर शे. हातम, मो. सईद मो. सादिक, ममता मधुकर घोरे, जलील अहमद खान, नसरीन बानो शेख सुभान, खुशिंदा बानो अताउल्लाशा, मो. नाजिम मो. नजीर व कनिजा बानो हुसेनखाँ. या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande