रायगड : विजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये फार्मर डे उत्साहात साजरा
रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)। भारतात दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘किसान दिवस’ म्हणून ओळखला जातो. कृष
Farmers' Day celebrated with enthusiasm at Vision International School


रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)। भारतात दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘किसान दिवस’ म्हणून ओळखला जातो. कृषी क्षेत्र हे देशाच्या अन्नसुरक्षा, ग्रामीण विकास व आर्थिक प्रगतीचा कणा असल्याने या दिनाचे महत्त्व अधिक आहे. या पार्श्वभूमीवर म्हसळा येथील विजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि. २३ डिसेंबर रोजी फार्मर डे उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला मांदाटणे गावचे माजी सरपंच व आदर्श शेतकरी चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पवार यांनी विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांचे कष्ट, आधुनिक शेतीपद्धती तसेच शेतीतून निर्माण होणाऱ्या संधी याविषयी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि भविष्यात शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शाळेच्या वतीने पवार यांचे मार्गदर्शनाबद्दल आभार मानण्यात आले. कार्यक्रमात बोलताना स्कूलचे चेअरमन मोईज शेख यांनी सांगितले की, शेती हा भारतीय व्यवस्थेचा कणा असून आर्थिक विकासाचा मूलभूत घटक आहे. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही राबविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.शाळेमध्ये आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांतील सहभागी विद्यार्थ्यांना चंद्रकांत पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी वेषभूषा परिधान करून शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभव घेत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाला आदर्श शेतकरी चंद्रकांत पवार, प्रिन्सिपल आर. के. सर, नाजनीन मॅडम, सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फार्मर डेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदर व जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande