
परभणी, 25 डिसेंबर (हिं.स.) पिकविम्यासाठी परभणी येथील कृषी अधीक्षक कार्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर सन 2019 मध्ये गुन्हे दाखल झाले होते. न्यायालयीन तारखांना सतत गैरहजर राहिल्याने संबंधित कार्यकर्त्यांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते. सर्व कार्यकर्ते जिल्हा न्यायालयात उपस्थित राहिले. न्यायालयात हजर राहून त्यांनी जमानती करून घेतल्या. यावेळी शेतकरी चळवळीचे नेते माऊली कदम आर्वीकर, डॉ. सुभाष कदम, विश्वंभर गोरवे शेळगावकर, हेमचंद्र शिंदे राजुरकर यांच्यासह अटक वॉरंट असलेले भानुदास शिंदे मालेवाडिकर, रोहिदास भडके नागठाणकर, विष्णुपंत भोसले इसादकर, ज्ञानोबा जोगदंड नरवाडीकर उपस्थित होते.
जमानती प्रक्रियेसाठी खटिंग मालेवाडीकर, भरत इंदुलवड, श्याम भोसले, आप्पासाहेब भोसले (इसादकर), गोरवे, कृष्णा जाधव, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी चळवळीला सातत्याने सहकार्य करणारे अॅड. विजय चौधरी यांनी कोणतीही फी न घेता सर्व कार्यकर्त्यांची जामीन प्रक्रिया पूर्ण करून दिली. त्यांच्या या सहकार्याबद्दल कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले. न्यायालयाने प्रत्येकावर 250 रुपये दंड आकारला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis