मुंबईत 'लॅव्हेंडर बेकरी'च्या तिसऱ्या आउटलेटचे दिमाखात उद्घाटन
मुंबई, २५ डिसेंबर (हिं.स.) : मुंबईतील खवय्यांच्या पसंतीस उतरलेले आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ''लॅव्हेंडर'' थीमसाठी ओळखले जाणारे ''लॅव्हेंडर बेकरी अँड डेझर्ट्स''चा विस्तार आता विलेपार्ले पूर्व करण्यात आला आहे. कांदिवली पूर्व आणि वर्सोवानंतर ब्रँ
लॅव्हेंडर बेकरी


लॅव्हेंडर बेकरी


मुंबई, २५ डिसेंबर (हिं.स.) : मुंबईतील खवय्यांच्या पसंतीस उतरलेले आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण 'लॅव्हेंडर' थीमसाठी ओळखले जाणारे 'लॅव्हेंडर बेकरी अँड डेझर्ट्स'चा विस्तार आता विलेपार्ले पूर्व करण्यात आला आहे. कांदिवली पूर्व आणि वर्सोवानंतर ब्रँडने आपल्या विस्ताराचा पुढील टप्पा गाठत तिसऱ्या आउटलेटचे दिमाखात उद्घाटन केले.

शांत आणि प्रसन्न वातावरण, लॅव्हेंडर फुलांच्या रंगाची मोहक सजावट आणि जिभेवर रेंगाळणारी चवीष्ट डेझर्ट्स यामुळे या कॅफेने अल्पावधीतच मुंबईकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. विलेपार्ल्याच्या गजबजलेल्या चित्तरंजन रोडवर असलेल्या राजमोहन सी.एच.एस.एल. मध्ये हे नवीन दालन सुरू झाले असून, याठिकाणी ग्राहकांना सिग्नेचर डेझर्ट्स, आर्टिसनल बेक्स आणि खास कॉफीचा आस्वाद घेता येणार आहे.

या विस्ताराबाबत आपला आनंद व्यक्त करताना लॅव्हेंडर बेकरी अँड डेझर्ट्सचे संस्थापक रौनक सुवर्णा म्हणाले की, एक शांत आणि गोड पदार्थांनी नटलेला कॅफे सुरू करण्याची आमची साधी कल्पना आज अपेक्षेपेक्षा जास्त मोठी झाली आहे. कांदिवली आणि वर्सोवा येथील ग्राहकांनी दिलेल्या प्रेमामुळेच आम्हाला विलेपार्ले सारख्या उत्साही भागात पाऊल ठेवण्याची प्रेरणा मिळाली. इथल्या लोकांसाठी लॅव्हेंडरचा हा खास अनुभव घेऊन येताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

नाताळच्या मुहूर्तावर सुरू झालेले हे नवीन दालन केवळ खाद्य पदार्थाचे ठिकाण नव्हे, तर निवांत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande