अंधेरीतील निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावर भीषण आग; ४० जणांना सुखरूप वाचवले
मुंबई, 25 डिसेंबर (हिं.स.)।मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात गुरुवारी सकाळी एका 23 मजली निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने, या इमारतीतून एकूण 40 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरा देसाई रोडवरील कंट्री क्लबजवळ असलेल्या सोरेंटो टॉवर या इमारतीला सकाळी सुमारे 10 वाजता आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. सध्या आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली आहे.या घटनेबाबत एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, 16व्या मजल्यावरील रिफ्यूज एरियामधून जिन्यांच्या मदतीने 30 ते 40 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच एका महिलेसह इतर तीन जणांना श्वसन उपकरणांचा (ब्रीदिंग अपॅरॅटस) वापर करून 15व्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आगीमुळे 10व्या ते 21व्या मजल्यादरम्यान असलेल्या इलेक्ट्रिकल शाफ्टमधील वायरिंग व इतर साहित्य, राउटर, स्विच रॅक तसेच विविध मजल्यांवरील डक्टजवळ ठेवलेल्या लाकडी फर्निचरचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने किमान चार अग्निशमन गाड्या आणि इतर उपकरणांच्या मदतीने सकाळी 11.37 वाजता आग पूर्णपणे विझवली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

 rajesh pande