
कोल्हापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)।
मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सदिच्छा भेट घेतली. याबाबत फोटोसह माहिती कोल्हापूरात आल्यानंतर तो चर्चचा विषय ठरला.
विधान सभेच्या निवडणूकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजीतसिंह घाटगे यांनी कागल नगरपालिकेच्या निवडणूकीच्या एकत्र आले. तेही शिवसेना शिंदे गटाचे माजी खा. संजय मंडलिक यांना थेट विरोध करण्यासाठी. हा निर्णय मुश्रीफ घाटगे यांनी कार्यकर्त्यांच्या परस्पर आणि अचानक घेतला होता. त्याबाबत दोघांच्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. शरद पवार यांनी राज्यातील आपल्या पक्षाच्यासर्वच नेत्यांना स्थानिक पातळीवर कोणाशीही आघाडी करा असे स्पष्ट सांगीतले होते. पण ना. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले म्हणून एकत्र आलो असल्याचेही सांगीतले होते. दोन राष्ट्रवादीचे नेते एकत्र येताना भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस यांची परवानगी घेतात. हे कोडे असताना मुश्रीफ-घाटगे यांनी शिंदे शिवसेनेच्या मंडलिक यांचा जवळ जवळ पाडाव केला.
समरजीत घाटगे हे भाजप मध्ये होते. आणि ते पक्षाचे जिल्हाध्यक्षही होते.
मुश्रीफ-घाटगे असलेला वाद सुरु होता. भाजपचे प्रवर्तक किरिट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मुश्रीफ यांना लक्ष केले. त्यांच्यावर ईडी, आयकर विभागाच्या मुश्रीफांवर धाडी पडल्या. मुश्रीफ कुटुंब हतबल झाले. हे सर्व समरजित घाटगे यांनी धडवून आणल्याचे आरोप केले.
त्यानंतर कट्टर विरोधक असलेले मंत्री मुश्रीफ अजित पवारां सोबत महायुतीत आले. मुश्रीफांवरील कारवाईचा ससेमीरा टळला. त्यामुळे भाजपकडून घाटगे यांना आमदारकी मिळणे दुरापास्त झाले आणि घाटगे भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यांनी कागल मधून विधानसभेची निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत राहून राजकीय भवितव्य फारसे आशादायक नाही हे लक्षात आल्याने अस्वस्थ असलेल्या घाटगे आता पुन्हा वेगळ्या वाटेवर आहेत. शिवसेना शिंदे गट आणि पर्यायाने संजय मंडलिकाच्या विरोधात दोघेही उभे ठाकले आहेत. आणि त्यांना मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे सरळ सरळ पाठबळ मिळत आहे. आज मुश्रीफ-घाटगेंनी फडणवीस-अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यातून समराजितसिंह घाटगे पुन्हा भाजप मध्ये जाणार का? भाजप मध्ये गेलेच तर ते नेमके काय साध्य करून घेणार याची उत्सुकता लागून राहीली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar