नांदेड - एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारली
नांदेड, 25 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारली, आई-वडिलही घरात मृतावस्थेत आढळले आहेत .या घटनेनं पोलीसही चक्रावले आहेत. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या जवळा येथील एकाच कु
नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. : नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारली, आई-वडिलही घरात मृतावस्थेत आढळले, घटनेनं पोलीसही चक्रावले


नांदेड, 25 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारली, आई-वडिलही घरात मृतावस्थेत आढळले आहेत .या घटनेनं पोलीसही चक्रावले आहेत. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई-वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. आई-वडिलांचा घातपात की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.

तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील ही दुर्दैवी घटना आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस प्रशासन चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. चारही जणांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

मृतांची नावे आणि वय-

उमेश रमेश लखे, वय 25 वर्षे (मुलगा)

बजरंग रमेश लखेस वय 22 वर्षे (मुलगा)

रमेश सोनाजी लखे, वय 51 वर्षे (वडील)

राधाबाई रमेश लखे, वय 45 वर्षे (आई)

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावातील चौघांचे मृतदेह आज आढळले. गावातील रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांच्या उमेश अन रमेश या दोन मुलांचे मृतदेह मुगट इथल्या रेल्वे रुळावर आढळले.

----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande