
अकोला, 24 डिसेंबर, (हिं.स.)। अकोल्याच्या पातूर पंचायत समिती अंतर्गत वहाळा बु. ग्रामपंचायतीतील कथित अपहार प्रकरणाच्या चौकशी अहवालाला टाळाटाळ होत असल्याने तक्रारदार संघपाल संसारे आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायत सचिव सागर रोठे यांनी लाखोंचा अपहार व निकृष्ट दर्जाची कामे केल्याचा आरोप असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही अहवाल न मिळाल्याने संसारे यांनी २४ डिसेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाची तयारी केली. मात्र गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी निर्णय पुढे ढकलला. पेट्रोलची बॉटल हातात घेऊन दिलेल्या चेतावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे