नाशिकमध्ये वकिलानेच वकिलाकडे मागितली खंडणी
नाशिक, 24 डिसेंबर (हिं.स.)। दाखल गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी वकिलाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अ‍ॅड. सुदाम पुंडलिक गायकवाड (रा. देवळाली कॅम्प रोड, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले
नाशिकमध्ये वकिलानेच वकिलाकडे मागितली खंडणी


नाशिक, 24 डिसेंबर (हिं.स.)। दाखल गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी वकिलाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अ‍ॅड. सुदाम पुंडलिक गायकवाड (रा. देवळाली कॅम्प रोड, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास नाशिकरोड न्यायालयाच्या वकील बार असोसिएशनच्या रूममध्ये आरोपी अ‍ॅड. नाना झांबर पवार (रा. नाशिक) हे आले. त्यांनी दाखल केलेल्या

गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी अ‍ॅड. गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास तुमचा कार्यक्रम करू, असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. अ‍ॅड. पवार यांनी दिलेल्या धमकीमुळे घाबरून जाऊन फिर्यादीच्या खिशातील दहा हजार रुपये काढून ते आरोपी अ‍ॅड. नाना पवार याला दिले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वकिलाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande